February 5, 2026

वाळूज महानगर, (ता 20) – दिव्यांग आधार व पुनर्वसन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बजाजनगर येथे दिव्यांगlसाठी घेण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पतंजली योग परिवार बजाजनगरतर्फे दिव्यांग महिलांना साड्या आणि मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांच्या प्रकाशात आणि आनंदाच्या वातावरणात सारा परिसर उजळून निघाला होता. विशेष म्हणजे उत्साह, आनंद आणि मानवतेचा सुंदर संगम यावेळी पहावयास मिळाला.


संस्थेचे अध्यक्ष दत्ता वाकडे आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हणाले की, “दिव्यांग असणे म्हणजे जीवनाची मर्यादा नव्हे, तर ती एक नवी शक्ती आणि दृढ संकल्पाची ओळख आहे. ही दीपावली सर्वांच्या जीवनात नवा आत्मविश्वास आणि उज्ज्वल आशेचा किरण घेऊन आली आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योग परिवाराचे प्रमुख नवसरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एम.आय.डी.सी. अधिकारी सरोटे, उद्योजक जनार्दन निकम, कृष्णकुमार जयसवाल, लक्ष्मण शिंदे, आसाराम करपे, मनीषा खेडुळकर, पी. एस. गुजर, अमृत मराठे, कल्याण तवले, विभीषण शेळके, रघुनाथ जगताप, आर. डी. शिंदे उपस्थित होते.

यास्नेह मिलनात बजाजनगर व परिसरातील सुमारे शंभरहून अधिक दिव्यांगांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मगौरवाची झलक दिसून येत होती.

संस्थेचे उपाध्यक्ष पारसचंद साकला, सचिव विष्णुदास पाटील, कोषाध्यक्ष किशोर फेगडे, सहसचिव लक्ष्मण धडेकर, शिवाजी दांगट, राजे बद्रीभाऊ लगाने आणि विठ्ठल भवर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दत्ता वाकडे, सूत्रसंचालन विष्णुदास पाटील, तर आभार शिवाजी दांगट यांनी मानले. दीपांच्या प्रकाशात, एकतेच्या भावनेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडलेला हा स्नेहमिलन सोहळा सर्वांच्या मनात आनंदाचा ठेवा ठेवून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत समानता, सहयोग आणि मानवतेचा संदेश दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *