वाळूजमहानगर, ता.6 (बातमीदार) – दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार तथा मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सोमवारी (ता. 6) रोजी वाळूज महानगरात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाळूजमहानगर युवा पत्रकार संघटना, व्हॉईस ऑफ मिडीया व जिल्हा मराठी पत्रकार संघ सवलग्नित वाळूजमहानगर पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुरूणे, रामराव भराड, संदिप चिखले, किशोर बोचरे, संदीप लोखंडे, संतोष उगले, शिवाजी बोडखे, अशोक कांबळे, अशोक साठे, राहुल मुळे, डॉ. संजय काळे, निलेश भारती, कवीराज साळे, अनिकेत घोडके, गजानन राऊत, शामसुंदर गायकवाड, पांडुरंग चोथे, संजय निकम आदीची उपस्थिती होती.