
वाळूज महानगर – बजाज नगर येथे एका 37 वर्षीय इसमाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता रोहित उत्तम आचार्य (वय 37 वर्ष) रा. एसटी कॉलनी बजाजनगर असे त्याचे नाव असल्याचे समजले. त्याची पत्नी माहेरी गेलेली असून तो घरी एकटाच होता. रात्री त्याने छताच्या हुकला साडीच्या साह्याने गळफास घेतला असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे गुढ समजू शकले नाही.
