वाळूजमहानगर, (ता.14) – वाळूज परिसरातील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी व हायटेक इंजिनिअरिंग महाविद्यालय, बजाजनगर च्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.12) जानेवारी 2023 सायंकाळी 4 वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून रांजणगाव येथील राजमाता जिजाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक कुमार बिरदवडे यांची उपस्थिती लाभली. यावेळी बिरदवडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या समाज कार्यावर व्याख्यान दिले. या प्रसंगी संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
