February 5, 2026

 

वाळूजमहानगर ता.19 (बातमीदार) – पुत्रप्राप्ती, सुखी संसार सर्वांना सुख शांती लाभो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून
उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा हा धार्मिक सण बजाजनगर येथील रामलीला मैदानावर रविवारी (ता.19) रोजी सायंकाळी 7 वाजता अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला व पुरुषांची अलोट गर्दी झाली होती.

आपापसातील वैरभावना नष्ट होऊन सर्वांना सुख शांती मिळावी, तसेच पुत्रप्राप्ती व सुखी संसार यासाठी उत्तर भारतात छठ पूजा हा धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून वाळूज परिसरात स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम येथील उत्तर भारतीय एकत्र येऊन बजाजनगर येथेच छठपूजा साजरी करतात.

यासाठी बजाजनगर येथील रामलीला मैदानावर श्रीराम जानकी प्रतिष्ठान चोख व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी आणि सोमवारी या दोन दिवस छठपूजेचासण साजरा होतो.यानिमित्त सलग चार दिवस उपवासाचे वृत्त करण्यात येते. उवळत्या सूर्याला अर्ध्य देऊन या सणाला सुरुवात होते. आणि उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन छट पूजेची सांगता होते. रविवारी (ता.19) रोजी सायंकाळी महिलांनी पाण्याच्या हौदात उतरून मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. यावेळी छटमाता, पिंड यांची पूजा करण्यात आली.

या छटपूजेसाठी श्रीराम जानकी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आर के सिंह, कार्यकारी अध्यक्ष बच्चा सिंह, उदय प्रताप सिंह, महामंत्री श्रीराम जानकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राघवेंद्र सिंह, संघटक धर्मवीर सिंह, कोषाध्यक्ष राघव प्रसाद वर्मा, साहिल सिंह, विवेक सिंह, ज्योति स्वरुप मित्तल, प्रवीन सिंह, नरपत सिंह, जितेंद्र सिंह, नारायण चौधरी, आनंदसिंह सिसोदिया, ईश्वर पटेल, प्रेमसिंह भाटी, दुर्गेश राजपूत, अशोक पांडेय, मिथिलेश पांडेय, नरेन्द्रसिंह यादव, पुजारी महंत राजेश्वरानंद पांडेय, पवन पांडेय आदी परिश्रम घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *