वाळूजमहानगर (ता.30) – बजाजनगर येथे वाळुज औद्योगिक वसाहतीतील हजारो उत्तर भारतीय महिला व पुरुषांनी रविवारी (ता.30) रोजी सायंकाळी मावळत्या सूर्यदेवतेची पूजा करून दर्शन घेत छटपूजा मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरी करण्यात आली. यावेळी रामलीला मैदानावर अलोट गर्दी झाली होती.
वाळुज औद्योगिक वसाहतीच्या विविध भागात स्थायिक झालेले हजारो उत्तर भारतीय बांधव सुमारे 25 वर्षापासून बजाजनगर येथील रामलीला मैदानावर एकत्र येत छटपुजा साजरी करतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला आणि पुरुषांनी पहिल्या दिवसी मावळत्या सुर्याची आराधना करत पाण्याने भरलेल्या कुंडात कमरेपर्यंत जाऊन डुबकी घेऊन व सूर्यदेवतेची विधिवत पुजा करुन त्यानंतर उपवास सोडवून छटपूजा उत्साहात साजरा केली.
यावेळी उत्तर भारतीयांच्या वतीने उपवासात दुध, फळे देण्यात आली. पूजेसाठी येणार्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन
उत्तर भारतीय संघाच्या वतीने संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. यावेळी रामलीला मैदान व उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. के. सिंग, उद्योजक नरेंद्रसिंग यादव, कुंदन त्रिपाठी, रघुनाथ सिंह, राजेश सिंग, आर. पी. सिंह,
राम जयप्रकाश सिंग, रामजनम सिंह, भूपेन्द्र सिंह परिहार, अरविंद सिंह, रोहितसिंग, बच्चासिंग रामाधार, हेमंत श्रीवास्तव, राधेश्याम शर्मा, कैलास यादव, राजेश सिंह, संजय सिंह, प्रदीप सिंह, अकवाल बहादुर सिंह, अमोघ प्रजापती, राहुल सिंह, राघवेंदर सिंग, गुड्डू सिंग, माया भूमिहार, शुभम सिंग, सनी सिंग, रोहन सिंग, सिद्धार्थ सिंग आदिंनी परिश्रम घेतले.