
वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका 47 वर्षाय इसमाने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.9) दुपारी बजाजनगर येथील आर एम 285,मध्ये दुपारी उघटकीस आली.
नानासाहेब दिनकर लांडगे वय 47) रा.पिपंळगाव ता.पाथर्डी, जि. अहमदनगर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. नानासाहेब लांडगे याने सोमवारी (ता.9) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत पंख्याला दोरीच्या सह्याने गळफास घेतला. माहिती मिळताच पोलीसानी घटनास्थळी धाव घेत ,लांडगे यास बेशुद्ध अवस्तेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
