वाळुज महानगर, (ता.29)- वाळूज महानगर येथील सम्यक गार्डनियामध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने गणगौर हा धार्मिक कार्यक्रम शुक्रवारी (ता.28) रोजी
मोठ्या उत्साहात झाला. यावेळी वाळूज प्रभागातील महीलांनी इसर – गौरादेचे गणगौर गीत गायन करून प्रतिकृती सादर केली. आणि उत्स्फुर्तपणे गीत गायन करीत ठेका धरला.
महाशिवरात्रीला शिव – पार्वतीचे लग्न होते.
लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा पार्वती माहेरी येते. तेव्हा त्यांना घ्यायला जेव्हा शिव त्यांच्या सासरी येतात. तेव्हा ही पुजा केली जाते. शुक्रवारी (ता.28) रोजी वाळुज महानगरात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात गौरी मिणियार शिवच्या भूमिकेत तर अंजली सारडा या पार्वतीच्या भुमिकेत होत्या.
विजया काबरा व उमा भन्साळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी समाजातील लीलाबाई मिणियार, दुर्गादेवी शर्मा, शिवकन्या तोतला, मनिषा राठी, कामिनी मिणियार, श्रध्दा शर्मा, डॉ. वैशाली तोतला, ज्योती भंडारी, बबीता शर्मा, विद्या सारडा यांनी परिश्रम घेतले.
