
वाळूजमहानगर ता.21 (बातमीदार) – विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बजाजनगर येथे माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने रविवारी (ता.19) रोजी गणगौर सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगोर सणानिमित्त बजाजनगरमधील हॉटेल मृगनयनी येथे सायंकाळी मॉम और किड्स डान्स, सिनियर सिटिझनसाठी रॅम्प वॉक आणि सर्व महिलांसाठी संगीतमय हौजी. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आकर्षण नीता लाहोटी (शिव) व सुरुची माहेश्वरी (पार्वती) यांची जोडी तसेच ग्रुप मधील सर्व महिलांचा पोशाख जो की भारतीय संस्कृतीला धरून होता हे ठरले. कार्यक्रमाचा शेवट रुचकर भोजनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजाजनगर येथील भावना माहेश्वरी, संगीता सोनी, कल्पना सोनी, दिपाली भक्कड, अनिता बंग,धनिषा भन्साळी, नम्रता तोष्णीवाल, पूजा मिनियार, राखी लाहोटी, पुनम राठी, समता राठी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विजया काबरा, उमा भन्साळी तसेच शितल मोदानी यांचे सहकार्य लाभले.
