February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – इप्का फाउंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (राज्य कर्करोग संस्था) आणि गेंब्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कर्करोग पूर्व तपासणी व कर्करोग जनजागृती शिबिरात जवळजवळ 80 महिलांनी बुधवारी (ता. 14) डिसेंबर 2022 रोजी सहभाग नोंदवला.

सिद्धिविनायक गणेश मंदिर, बजाजनगर येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने व डॉ.एम.डी. संकपाल (बाबा हिंदुस्तानी) यांच्या संगीतातून आरोग्य जनजागृतीने सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी उद्योगपती हनुमान भोंडवे तर प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वर जाधव हे होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय राज्य कर्करोग संस्थेचे स्त्रीरोग तज्ञ व कर्करोग शल्यचिकेसक डॉ. अर्चना राठोड यांनी दैनंदिन जीवनात आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवून वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आपण कर्करोगावर मात करू शकतो. त्याचबरोबर रोज शरीरातून घाम येईपर्यंत व्यायाम करणे, वजन मेंटेन ठेवणे, प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळण्याचे अवाहन केले.

महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता व कर्करोगाला वेळीच पायबंद करण्यासाठी इप्का फाउंडेशनचे व्यंकट मैलापूरे, डॉ.अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कर्करोग शिबिरात अद्यावत मोबाईल व्हॅन द्वारे 80 स्त्रियांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ञ डॉ. संजय राठोड, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. महादेव संकपाळ यांनी मार्गदर्शन व कर्करोगाबद्दल जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गेंब्स फाउंडेशनचे प्रमुख व्यवस्थापक गणेश मते, आशा स्वयं सेविका सहकारी तसेच, इप्का लॅबचे प्रफुल्ल कांबळे, रमेश बिरादार, संतोष कोटकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इप्का लॅबोरेटरीज कंपनीचे मानव संसाधन अधिकारी व्यंकट मैलापूरे यांनी केले. एकनाथ पवार यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *