March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – चालक म्हणून काम करत असलेले पाच जण खूप दिवसानंतर भेटले. त्यामुळे त्यांच्यात दारू पिण्याच्या आजण्याच्या कारणावरून हमरी तुम्ही झाली. यावेळी चौघांनी एका हाताचापटाने मारहाण व चाकू हल्ला करून जखमी केले. ही घटना सोमवारी (ता.17) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

गोपालकृष्ण विक्रम वैद्य वय 35 वर्षे रा. रांजणगांव (शे.पु.) हा ट्रॅव्हल्स गाडीवर चालक आहे. सोमवारी (ता.17) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या ओळखीचे चालक असलेले अक्षय, रंगनाथ महागोविंद व बाळू जरांडे असे बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात भेटले.
“खुप दिवसांनी भेटला, चल दारू पाज, पैसे दे ” असे ते म्हणाले. त्यांना दारु पाजण्यास व पैसे देण्यास नकार देत. मला दारु प्यायची नाही, घरी जायचे आहे असे सांगुन वेणूगोपाल हा घरी जाण्यास निघाला असता त्या चौघांनी मारहान करून चाकुने वार करत जखमी केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *