
वाळुज महानगर, (ता.26) – श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री गुरु चरित्र पारायण सोहळा समाप्ती, आरती व महाप्रसादाचे आयोजन शनिवारी (ता.26) एप्रिल रोजी बजाजनगर येथे करण्यात आले आहे.
बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, पियुष विहार, आनंद जनसागर मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (ता.26) एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची समाप्ती होऊन आरती व महाप्रसाद आयोजित केला आहे. यावेळी आरतीचे यजमान
उद्योजक हनुमान भोंडवे हे उपस्थित राहणार असून सर्व स्वामी भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे. असे अवाहन श्री स्वामी समर्थ मंदिर, पियुष विहार, बजाजनगर येथील स्वामी सेवेकऱ्यांची केले आहे.
