वाळूजमहानगर, ता.20 – छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची राज्याचे सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने बजाजनगर येथील शिवस्मारक मैदानावर घेण्यात आलेल्या आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी (ता.16) रोजी सायंकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी विजेत्या संघाला प्रमुख पाहुणे हर्षदा शिरसाट यांच्या हस्ते व सरपंच सुनील काळे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उद्योजक कैलास भोकरे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत बजरंग सी.सी. संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला उद्योजक कैलास भोकरे यांच्या वतीने 21 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या एन बी वॉरियर्स संघाला उद्योजक हनुमान भोंडवे यांच्या वतीने 11 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच रांजणगाव सी सी संघाने तृतीय क्रमांक मिळवला या संघाला राहुल नागवे यांच्या वतीने 5 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. आर. के.एन.सी.सी. विहामांडवा तालुका पैठण या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला या संघाला राजेंद्र कासारे यांच्यातर्फे 2100 रुपये पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अनिल तुपे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज रमेश शिराळे यांना तसेच आप्पा सोनवणे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज म्हणून ऋषी आवचार यांना तर राजाराम पाटील यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वैभव फुलारे यांना वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. या बक्षीस वितरण सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, दशरथ मुळे, विभागप्रमुख राजन सोमासे, पोपटराव हांडे, राजेश साळे, सचिन प्रधान, राम पाटोळे, संतोष नरोडे, राजेश कसुरे, प्रफुल्ल भोसले, गौरव पाटील, विष्णू उगले, योगेश साळे, रमाकांत भांगे, अशोक लगड, शशिकांत ढमढेरे, राजू शहाणे, शैलेश पाटील, बाबुराव गायकवाड, सागर शिंदे, प्रकाश निकम, अनिल जाभाडे, अनिकेत थोरात, गणेश सोनवणे, अण्णा कांडेकर, योगेश पवार, दीपक निकम, दीपक राजपूत, शुभम खरात, शुभम काळे, दौलत गायकवाड, दीपक धूरेकर, किरण आटोळे, अजित लंगे, गजानन कदम, आदित्य कासार, निलेश जैन, सचिन नायर, नवनाथ गावंडे, हर्षल ठाकूर आदींची उपस्थिती होती.