वाळूज महानगर (ता.7) :- युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन
बजाजनगर येथे मंगळवारी (ता.8) रोजी करण्यात आले आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी वाळुज परिसरात ठीक ठिकाणी यासाठी आढावा बैठका घेण्यात आल्या.
बजाजनगर येथे मंगळवारी रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या “जन आक्रोश आंदोलन”निमित्त शिवसैनिकांची पंढपुर येथे नुकतीच बैठक झाली. या सभेत अतिवृष्टीमुळे झालेले शेतमालाचे नुकसान, शेतमालाला भाव व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या. यावर चर्चा करण्यात येऊन आदित्य ठाकरे यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, पाटोदाचे उपसरपंच कपिंद्र पेरे, पंढरपूरचे ग्रामपंचत सदस्य महेंद्र खोतकर, गंगाधर खोतकर, विभागप्रमुख लखन सलामपुरे, उपविभागप्रमुख दीपक कानडे, शाखा प्रमुख प्रवीण चंदन, विष्णु राउत, प्रवीण मुनोत, गणेश सूर्यवंशी, शैलेश खोतकर, अनिल खोतकर, रामेश्वर शिंदे, दीपक साबळे, अब्बास शेख, किशोर पगारे, देविदास साठे, हुंबरे मामा, पांडूमामा जाधव, मनोज गांगुर्डे, विकास झळके, मनोज खोतकर, करण गायकवाड, सोनू आमराव यांच्यासह शिवसैनिक, पदधिकारी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.