
वाळूजमहानगर, (वार्ताहर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे बुधवारी 28 जानेवारी रोजी अकाली निधन झाल्याने आदरांजली म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
बजाजनगर येथील शिवसेना प्रचार कार्यालय, मनाली स्क्वेअर येथे दुपारी झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक हनुमान जगन्नाथ भोंडवे, बाळासाहेब वाल्मीक गाढे, रत्नमाला शशिकांत ढमढेरे, वडगाव (को.)- बजाजनगरच्या माजी उपसरपंच उषाताई हांडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा लगड, जयश्री घाडगे, मीनाक्षी भोंडवे, वैशाली देवरे, प्रियंका घोरपडे, श्रीकांत साळे, देविदास जाधव, हरिश्चंद्र जगताप, अशोक लगड, अधिकराव पाटील, रावसाहेब शिंदे, विजय उखळे, पंडित नवले, राजेंद्र माने आदींची उपस्थिती होती.
