March 23, 2026

 

वाळुज महानगर, (ता.27) – शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बजाजनगर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख विशाल खंडागळे यांच्या माध्यमातून बालगिरी महाराज गौशाळा आश्रम, बजाजनगर येथे चारा वाटप करण्यात आला.


यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, प्रभारी तालुकाप्रमुख विष्णू जाधव, गौशाळेचे प्रमुख ह.भ.प बालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहरप्रमुख विशाल खंडागळे यांच्या संकल्पनेतून बंदीस्त पाळीव कबुतराना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घआयुष्यासाठी महाआरती घेण्यात आली.

प्रसंगी उपतालुकाप्रमुख श्रीकृष्ण राठोड, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडेपाटील, उपशहरप्रमुख बिबन सय्यद, नामदेव सागडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील,

काकाजी जीवरग, विभागप्रमुख विनोद सोनवणे, त्रिम्बक जगताप, रोहिदास चव्हाण, संतोष चंदन, सतीश हिवाळे, भगवान देशमुख, रतन नलावडे, तिसगाव विभाग प्रमुख विनोद दाभाडे, गणेश कोल्हे, उपविभागप्रमुख लहू खराटे, सुनील गोरे, नितीन कलंत्रे, दादाराव गोरडे, आबासाहेब सपाटे, आकाश राकडे, साहेबराव शिरवत,

नरसिंह ढगे, किशोर पवार, शाखाप्रमुख अमोल वाघमारे, समाधान ठोंबरे, महिला आघाडीच्या तालुका संघटक अनिता पाटील, विभागप्रमुख शारदा घायवट, वंशराज देशमुख, संशोधन सावते, भागवत रेंगे नागरिक, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *