
बजाजनगर, (ता. 2) –
सानिध्यात बाबांच्या चार दिवस राहू
Vvपालखी च्या संगे शिर्डीस जाऊ…..
या ओळींचा अर्थ मनी घेत वाळूज महानगरातील श्री साईबाबा मंदिर संस्थान द्वारा गेल्या 24 वर्षांपासून बजाजनगर छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. श्री साईं भक्त मंडळी द्वारे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आयोजित हा दिंडी सोहळा गुरुवारी 3 जुलै रोजी शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
या पालखी प्रस्थान निमित्त गुरुवारी 3 जुलै रोजी सकाळी 7 वा बजाजनगर येथील साई मंदिरात दर्शन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ही दिंडी पदयात्रा लासूर स्टेशन, दहेगाव, सवंत्सर, कोकमठाण मार्गे 5 जुलै रोजी श्री साईं मंदिर शिर्डी येथे पोहचणार आहे.शिर्डी येथील साईं निवारा ते श्री साई समाधी मंदिरा पर्यंत भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.श्री खंडोबा मंदिरात सायंकाळी 6 वाजता आरती झाल्यानंतर या दिंडी पदयात्रे चा समारोप करण्यात येणार आहे. श्री साईबाबा मंदिर कमिटी चे पदाधिकारी आणि सदस्य हा दिंडी सोहळा यशस्वी होण्या साठी परिश्रम घेत आहेत.
