
वाळूजमहानगर (ता.9) – गांजा घेऊन दोन आरोपी बजाजनगर येथे विक्रीसाठी आले. मात्र त्याचवेळी पोलिसांनी छापा मारला. यात एक आरोपी जेरबंद करण्यात आला. मात्र दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. आरोपीच्या ताब्यातून सहा किलो गांजा जप्त करण्यात आला. की कारवाई बुधवारी (ता.8) रोजी करण्यात आली. 
बजाजनगर येथील अयोध्यानगरात अजय जाधव याने गांजाची झाडे विक्री करण्यासाठी घरात आणल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांना मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, पोना.धिरज काबलिये, पोकॉ.यशवंत गोबाडे, हनुमान डोके, सुरेश कचे, मपोकॉ.प्रियंका तळवंदे आदींनी बुधवारी (ता.8) रोजी सांयकाळी 7.30 वाजेच्या सुमारास छापा मारला. पोलिस आल्याची चाहुल लागताच तेथे असलेल्या दोघांनी पळ काढला. त्यापैकी एकास पकडले. मात्र दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारून पसार झाला. पकडलेल्या आरोपीच्या ताब्यातुन 6 किलो 191 ग्रॅम वजनाचा व 30 हजार रुपये किमंतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अजय धर्मराज जाधव (25, रा.जय जनार्धन सोसायटी, बजाजनगर) तर पळून गेलेल्या साथीदाराचे नाव प्रशांत आमटे रा.साईबाबा चौक, बजाजनगर. असे असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोकॉ.सुरेश भिसे यांच्या तक्रारीवरुन आरोपी अजय जाधव व फरार झालेल्या प्रशांत आमटे या दोघाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
