वाळूजमहानगर, ता.3 – बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला (31 डिसेंबर) रोजी व्यसनमुक्ती पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
यावेळी काढण्यात आलेली फेरी बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ काॅलनीतुन सुरू होऊन ती श्री राममंदिर, जयभवानी चौक, मनी प्लांट, चिंचबन काॅलनी, शिवराणा चौक, अल्फोन्सा हायस्कूल, मार्गे जाऊन पुन्हा इंद्रप्रस्थ काॅलनी येथे येऊन सांगता झाली. या फेरी दरम्यान व्यसनमुक्ती प्रचारक प्रदीप माळी, सामाजिक विचारमंचचे केशव ढोले, वृक्ष बॅकचे पोपट रसाळसर, टेकडी ग्रुपचे अग्रवाल, इंद्रप्रस्थ काॅलनीतील जगन्नाथ कोळी आण्णा, संदिप बहादुरे, निलेश कोटलवार, बाळासाहेब माने, नागेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उषा हांडे, शीला शिंदे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे
पथसंचलन व सूत्रसंचालन बाळासाहेब माने यांनी केले.