February 5, 2026

वाळुज महानगर (ता.26)- बजाज नगर येथील जागृत हनुमान मंदिर, दत्त मंदिर लोकमान्य चौका जवळील पंचमुखी महादेव मंदिर जवळच्या आर. एक्स. सेक्टर मधील रहिवासी भागात वीज पुरवठा बुधवारी 26 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास अचानक खंडित झाला.

वीज खंडित झाल्यांमुळे येथील रहिवाशांना घरात उकाड्या मुळे त्रास सहन करावा लागला.तसेच येथील पंचमुखी महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त बजाज नगरातील सर्वात मोठा उत्सव सुरू असून येथील अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या शेवटच्या कीर्तनात वीज अचानक गायब झाल्यामुळे मोठी बाधा निर्माण झाली. त्यामुळे उपस्थित शेकडो भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हरिओम सोसायटीतील महादेव मंदिर येथेही भजनाचा कार्यक्रम सुरू होता. आता उन्हाळ्यात निदान रात्री तरी वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी संतप्त भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.अखेर 20 मिनिटांनी विज पुरवठा सुरू झाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *