March 22, 2026


वाळुज महानगर, (ता.23) – संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक विचार मंच, टेकडी पर्यावरण समिती, विघ्नहर्ता गणपती मंदिर समिती व परिसरातील स्वच्छता प्रेमींच्या पुढाकाराने गाडगेबाबांना अभिवादन करून बजाजनगरातील विविध परिसरात तीन दिवसीय महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

प्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या तीन दिवसांत मोहटादेवी मंदिर जवळील स्मशानभूमी, स्व. के व्हि हिंगणकर नाना नानी पार्क परिसर व विघ्नहर्ता गणपती मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी सामाजिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वडगाव को. सरपंच सुनील काळे, उद्योजक हनुमान भोंडवे, बाळासाहेब कार्ले, रुपचंद अग्रवाल यांनी गाडगेबाबांना अभिवादन करत मनोगत व्यक्त केले. या अभियानासाठी प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ माले व डॉ अमोल काकड यांनी गाडगेबाबांच्या जिवनावर उजाळा देत आरोग्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शेलगावकर यांनी केले तर आभार केशव ढोले यांनी व्यक्त मानले. या अभियानासाठी परमेश्वर गणाचार्य, नंदकुमार कुलकर्णी, अमर निकम, ऋषिकेश पाटील, राजाभाऊ ठाकरे, बबनराव सुपेकर, माणिक कुंभार, व्यंकटेश भोरे, नवनाथ राजे, विश्वनाथ धोंडगे, विनोद वडोदकर, शिवाजी राऊत, बी जी पाटील, दिलीप दबडे, बाळासाहेब माने, जगन्नाथ कोळी, दिलीप डांगे, विश्वंभर राठोड, भाऊसाहेब देवकर, अशोक मानकर आदिंनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *