February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.23) – संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या वतीने कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवारी (ता.25) रोजी सकाळी 9.30 वाजता बजाजनगर येथील हायटेक यांत्रिकी महाविद्यालयात बारावे झेप साहित्य संमेलन आयोजित करण्यात करण्यात आले आहे.

प्रवीण बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचे उद्घाटन इप्का लँबोरेटरीज कंपनीचे मानव संसाधन अधिकारी व्यंकट मैलापूरे यांच्या हस्ते सकाळी होईल. यावेळी प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते शाहीर नारायण जाधव समाजभुषण पुरस्कार आणि कवयित्री हरणाबाई जाधव वाड्:मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार निवड समिती अध्यक्ष ए. बी. साळवे, ज्येष्ठ प्रकाशक के.एस. अतकरे यांची प्रमुख उपस्थिती राहिल. प्रथम 8.30 वाजता दिग्दर्शक मनोज कदम ग्रंथ दिंडींचा शुभारंभ करतील. डॉ. सावली राऊत यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनचे उद्घाटन होईल. डॉ. वासुदेव मुलाटे ग्रंथ प्रकाशित करतील. दुपारी 12 वाजता प्रा. पंजाबराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या “लोकशाही जीवन प्रणाली आणि भारतीय मानसिकता”या परिसंवादात प्रा.डॉ. वैशाली बोदेले, प्रा.डॉ. मारोती गायकवाड, प्रा.डॉ. वि. दा. म्हस्के, प्रा.डॉ. वीणा माळी हे भाष्य करतील. दुपारी 2 वाजता नानाभाऊ परिहार यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3.30 वाजता कविसंमेलन सुरु होईल. दशरथ सुरडकर, छाया बैसाणे, डॉ. बलराज पांडवे, सर्जेराव चव्हाण, उषा घायतडक यांची प्रमुख उपस्थिती राहिल. सायंकाळी कथाकार विलास सिंदगिकर यांच्या भाषणाने समारोप होईल. डॉ. दिलीप घारे यांची प्रमुख उपस्थिती राहिल. गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, माजी गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके, लेखक डॉ. राजेंद्र शेजूळ, साहित्यिक डॉ. मिलिंद रणवीर यांचा गौरव करण्यात येईल. यावेळी सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या साहित्य संमेलनात रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन स्वागताध्यक्ष बी जी गायकवाड, संयोजक डी.एन. जाधव, निमंत्रक प्रा. शिवाजी वाठोरे, कार्यवाह बबन महामुने यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *