February 5, 2026

वाळूजमहानगर – बजाजनगर येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रांगणात सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवस व सिद्धीविनायक गणेश मंदिर योग वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी 26 नोव्हेंबर पासून पाच दिवसीय निःशुल्क योग प्राणायाम शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.


येथील शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, वडगाव (को.)- बजाजनगरचे माजी सरपंच महेश भोंडवे, पतंजली योग समिती व सिद्धीविनायक गणेश मंदिर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मुख्य प्रशिक्षक म्हणून योगगुरू प्रवीण बनकर व योगगुरू जनार्दन नवसारे यांची उपस्थिती आहे. हे शिबिर श्रुती शिंदे, गायत्री शेटे, प्रसाद महामुलकर, मोना राजपूत, डॉ. शैलेश माखनीकर, शिवाजी साखळे, अंकुश भानुसे, कल्याण तवले, पदमाकर मोरे, लक्ष्मण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.

बुधवारी 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दररोज पहाटे 5:30 ते सकाळी7:30 वाजेपर्यंत हे शिबीर होईल. या शिबिरात सहभाग घेणाऱ्या सर्व धर्मीय योग साधकांनी उपासीपोटी यावे. तसेच स्वतःच्या आसनासाठी चादर, हात रुमाल, पाणी, नोटबुक-पेन सोबत ठेवावे. साधक व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन हनुमान भोंडवे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *