March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.4) – बजाजनगरातील मोहटादेवी मंदिरातर्फे शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोहटा देवीची भव्य पालखी शोभा यात्रा (छबिना ) काढण्यात आली.

ही शोभायात्रा बजाजनगरातील लोकमान्य चौक परिसर व जागृत हनुमान मंदिर समोरून मार्गक्रमण करत मोहटादेवी मंदिरात गेली. तेथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत मदन सानप, विष्णु खेडकर, प्रभाकर बडे, अरविंद पाले, नवनाथ बडे, शहादेव फुंदे, नामदेव आघाव, ज्ञानेश्वर धुर्वे, गणेश पळसकर, मिनीनाथ खरबडे, रेखा आंधळे, ज्योती दौड, नंदा नागरगोजे, सुवर्णा सानप, कांचन खेडकर, राधा जाधववर, चंद्रकला फुंदे, पुष्पा आघाव, संध्या कदम यांच्यासह भावीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *