March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कमळाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गुरुवारी (ता.2) रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. परिणामी बजाजनगरातील कमळाचे खतपाणी कमी झाल्याने ते कोमेजले जाण्याची शक्यता आहे.

भाजपाचे माजी जि.प.सदस्य तथा उपजिल्हाध्यक्ष पश्चिम अरविंद धिवर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव लांडेपाटील, भाजपा पश्चिम तालुकाध्यक्ष तथा बजाजनगर – वडगांव (को.)चे माजी सरपंच बाळासाहेब कार्ले पाटील,
भाजपा कार्यकर्ता तथा उपसरपंच बजाजनगर – वडगाव (को.) चे कृष्णा साळेपाटील, सरचिटणीस तथा माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, बजाजनगर वार्ड अध्यक्ष संजय मुरादे पाटील, वार्ड अध्यक्ष धोंडीबा वरवरे, गटप्रमुख बाळासाहेब शिंदे, भाजपा बजाजनगर अध्यक्ष राजेंद्र भंगाळे, शाखाप्रमुख श्रीनिवास मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघटनात्मक शक्तीवर विश्वास ठेवत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.2) मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या हातावर शिवबंधन बांधत या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्ह्यप्रमुख किशनचंद तनवाणी, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख बजाजनगर सागर शिंदेउपस्थित होते.
बजाजनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र येथे दोन गट पडल्याने हा किल्ला दुभंगला गेला. शिवाय शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपा मध्ये गेले होते. मात्र त्यांच्यात नेहमी मतभेद होत असल्याने त्यातही दोन गट पडले होते. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अनेक महिन्यांपासून खुसपुस सुरू होती. त्याचाच परिणाम म्हणून अखेर भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे बजाजनगरातील कमळाचे खतपाणी (मत) कमी झाल्याने निश्चितच येथील कमळ कोमेजले जाण्याची शक्यता आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *