February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.8 – छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे आमदार तथा सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या स्वागतार्थ बजाजनगर येथे भव्य आमदार चषक- 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 10 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

येथील हायटेक कॉलेज शेजारील शिवस्मारक येथे होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कैलास भोकरे यांच्याकडून 21 हजार रुपये, द्वितीय 11 हजार रुपये हनुमान भोंडवे, तृतीय 5 हजार रुपये राहुल नागवे यांच्याकडून तर चतुर्थ 2 हजार 500 रुपये राजेंद्र कासारे यांच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच मॅन ऑफ द मॅच अनिल तुपे यांच्या वतीने 2 हजार 100 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 2 हजार 100 रुपये आप्पासाहेब सोनवणे, तर उत्कृष्ट फलंदाज 2 हजार 100 रूपये राजाराम पाटील असे विशेष पारितोषके देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी फिस 1500 रुपये असून संपर्क निलेश जैन -8805744245, शैलेश पाटील – 9130413418, आदित्य कासार – 9049842162, सचिन नायर – 7020036071, अनिकेत थोरात – 9168350774 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी. असे आवाहन संयोजक शिवसेना संघटक प्रफुल्ल भोसले, आयोजन समितीच्या हर्षदाताई शिरसाट मित्र मंडळ व शिवसेना पश्चिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *