March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.27) – बंगाली एसोसिएशन वाळूज एमआयडीसीच्या वतीने 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत श्री श्री दुर्गा पूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

बजाजनगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर आनंद हॉल येथे हा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव कोलकाता प. बंगाल येथील प्रमुख उत्सव असून वाळूजमहानगरात दुर्गा पूजेचे हे 22 वे वर्ष आहे. श्री दुर्गा, कार्तिक, सरस्वती, लक्ष्मी व गणपतीच्या या मूर्तीं इको फ्रेंडली असून त्या कोलकाता मूर्तिकारानी तयार केल्या आहेत. श्री श्री दुर्गा पूजा उत्सवाचा रविवारी 28 रोजी सकाळी 8 वाजता शुभारंभ होणार आहे. कोलकाता येथील पंडित विश्वजीत मुखर्जी आणि त्यांचे सहकारी पंचानंद मुखर्जी पूजेचे पौराहित्य करणार आहेत. पूजा, आरती, प्रसादानंतर सायंकाळी आरती समारोह होणार आहे. सोमवारी 29 सप्टेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमानंतर रात्री 8 वाजता बालक व महिलांसाठी चित्रकला, शंखनाद, दीप प्रज्वलन आदि स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुर्गा पूजेची मंगळवारी 30 रोजी महाअष्टमी दिनी मुख्य पूजा विधी होईल. या दिवशी संधिपूजा आणि देवीला फळ बलिदान, 108 दीप प्रज्वलनानंतर महाप्रसाद व रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमासह गरबा, रास दांडिया, क्रीड़ा स्पर्धा होणार आहे. महानवमी निमित्त बुधवारी 1 आक्टोंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी सकाळी 11 वाजता ‘सिंदूर खेला’ ही बंगाल येथील पारंपरिक कला, नृत्य महिला सादर करतील. व त्यानंतर कायगाव येथील गोदावरी नदीत मूर्ती विसर्जित करण्यात येणार आहेत. बंगाली असोसिएशन एम आय डी सी वाळूजच्या स्थापनेत स्व.एन दत्ता व मानवेंद्र चक्रवर्ती यांनी पुढाकार घेत ही परंपरा सुरू केली आहे. श्री श्री दुर्गा पूजा आयोजनासाठी बंगाली एसोसिएशन वाळूज एमआयडीसीचे अध्यक्ष निरंजन दास, उपाध्यक्ष गोलोक बैन, सचिव – विमान मंडल, कोषाध्यक्ष मृत्युंजय पात्रा, मानवेंद्र चक्रवर्ती, ए के पाल, गौतम चक्रवर्ती, उत्तम कायल, गौतम कायल, विश्वजीत मंडल, आलोक कर्मकार, आलोक घोष, के डी दास, एच पी दास, पी पाल, एम घोष, डी कोले, रविन मंडल, विष्णु मंडल, सत्यजीत विश्वास, सुनीता दत्ता, रितु मंडल, रमूला कोयल, जमुना मंडल, मीता बैन, नंदिता पात्रा, रूपा दास, शुक्ला कर्मकर, काजल सात्रा, मुन्नी रॉय, सुपर्णा मंडल, सुलेखा कोयल, पूर्णिमा दास, मंपी कोले, देवी घोष, सुखवती दत्ता, रूपा दास, चंपा मंडल, ममता देबांध, रूपा घोष, ईला डे, मौसमी पाल, पूर्णिमा भुईन, निवेदिता कोले, सोमी दत्ता यांच्यासह एसोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *