वाळूजमहानगर (ता.20) – बजाजनगर येथील विघ्नहर्ता गणपती मंदिर ट्रस्ट व सामाजिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण शुद्धी यज्ञ रविवारी (ता.19) रोजी आयोजन करण्यात आले होते.

बजाजनगर हे औद्योगिक क्षेत्रालगत असलेली कामगार वसाहत, विविध औद्योगिकीकरणामुळे अशुद्ध वातावरणात निर्माण होते. याचा सामाजिक दृष्ट्या विचार करत विघ्नहर्ता गणपती मंदिर ट्रस्ट व सामाजिक विचार मंच तर्फे या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी आचार्य कृष्णदेव आर्य, गुजरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ सुजाता करंजगावकर वैदीक विचारक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या यज्ञासाठी प्रमुख यजमान म्हणून केशव ढोले, शालीनी ढोले, मुरलीधर बाबर, विमल बाबर, मेनिनाथ कवडे, सोनु कवडे, व सुदाम डोंगरे, शांताबाई डोंगरे यांची निवड करण्यात आली. या यज्ञाच्या यशस्वीतेसाठी दिलीप दबडे, रवींद्र शेलगावकर, वाल्मिक धोक्रट, शिवाजी राऊत, राजुदास चव्हाण, डॉ अमोल काकड, संजय कवडे, नवनाथ राजे, राजेंद्र मोरे, सिमा कडु, सविता राऊत, प्रियांका काकड, मनिषा दोड, सुमन धोक्रट आदिंनी परिश्रम घेतले.
