February 5, 2026

 

वाळूजमहानगर – बजाजनगरातील बीएसएनल गोडावून समोर उभी केलेली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरूवारी (20) रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पप्पु आप्पासाहेब पगारे हा बजाजनगर येथील बीएसनल गोडावून जवळ राहतो. राहत्या घरासमोर समोर त्याने गुरूवारी 20 नोव्हेंबर रोजी रात्री 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 20,एफ एस-9916) ही हॅन्ड लॉक करून उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून लंपास केली. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली. म्हणून तीचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *