
वाळुज महानगर- बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रात्री उभे करून ठेवलेले 2 लाख रुपये किमतीचे पाण्याचे टँकर ट्रालीसह अज्ञात चोरट्याने सकाळ होण्यापूर्वी चोरुन नेले. बजाजनगर येथील वृंदावन पार्क येथे 1 डिसेंबर रोजी झालेल्या या चोरी प्रकरणी मंगळवारी 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष पांडुरंग साबळे (वय 38 वर्षे) रा. आष्टविनायकनगर, रांजणगाव शेणपुंजी या चालकाने फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ विजय पांडुरंग साबळेच्या नावावर असलेले पाण्याचे ट्रॅक्टर (एम एच 37, एल -9353) हे चालवुन कुंटुंबाचा उदनिर्वाह करतो.
सोमवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास पाण्याचे ट्रॅक्टर वृंदावन पार्क बजाजनगर या ठिकाणी विनोंद धुरट याच्या घराचे काम चालु असल्याने तेथे ट्रक्टर व पाण्याची ट्रॉलीसह उभा केले होते. ते रात्री 1 सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. दोन लाख रुपये किमतीच्या व सिल्वर रंगाच्या ट्रॅक्टरचा आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
