March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – बजाजनगर येथील चिंचबन कॉलनीत असलेल्या रामेश्वर महादेव मंदीरात शनिवार 11 मार्चपासून 13 मार्चपर्यंत विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कलशारोहन, प्राणप्रतिष्ठा आणि सभामंडपाचे भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळयाच्या आरंभी 11 मार्च रोजी होमहवन, सायंकाळी 8.30 वाजता ह.भ.प. जनार्धन बोचरे यांचे किर्तन, 12 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता प्राणप्रतिष्ठा व आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमीपूजन तर सायंकाळी 8.30 वाजता ह.भ.प. अप्पा महाराज गायके यांचे किर्तन, 13 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता कळस नगरप्रदक्षिणा यानंतर ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांच्या हस्ते कलशारोहन आणि दुपारी 1 ते 2 काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहान महादेव मंदीराचे अध्यक्ष अशोक बैनाडे, उपाध्यक्ष दत्ता घोडके, सचिव अरुण वरे, कोषाध्यक्ष विजय थोरात, सहकोषाध्यक्ष पंढरीनाथ अभंग, सदस्य अरुण घुले, बाबासाहेब गोजे, राजेंद्र मोरे, ज्ञानेश्वर रावते, खोडदे आप्पा, अशोक टेके, विजय सरकटे, संतोष देशमुख, नानासाहेब गोरे, विलास फलके, महावीर पांडे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *