February 19, 2025

वाळूजमहानगर, ता.21 (बातमीदार) – विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली. ती सुरूच असून पुन्हा मंगळवारी (ता.21) रोजी बजाजनगर येथील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेना (उभाठा) ला जय महाराष्ट्र केला.

  • संभाजीनगर पश्चिमचे तालुका समन्वयक सचिन गरड व युवा सेनेचे तालुकाप्रमुख विजय सरकटे यांच्या लेटरहेडवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे पक्ष पदाचे व सदस्यताचे राजीनामे देऊन शिवसेना (उभाठा) ला जय महाराष्ट्र करणाऱ्यांमध्ये तालुका समन्वयक तथा वडगाव (को.) बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे, उपशहर प्रमुख बीबन सय्यद, किशोर खांडरे, नामदेव सागडे, सुरेश जगताप, नवनाथ मनाळ, त्र्यंबक जगताप, नंदकुमार साळुंके, सतीश हिवाळे, रतन नलावडे, आसाराम करपे, तुषार ढवळे, ज्ञानेश्वर लांडे, गोकुळ साळुंखे, मंगेश चक्कर, भागचंद खरात, रामनाथ खेडकर, विनायक गरड, बाळू माने, सुरेश गायकवाड, सुरज वाघ, गोकुळ राठोड, प्रणव तवले, रवी म्हस्के, सुरज गरड, चिन्मय पाटील, विजय टाक, ऋषिकेश बोरसे, निखिल फरताळे, शिवा चव्हाण, अमित देशमुख, अक्षय भोसले, दीपक साखरे, शिवसेना महिला आघाडीच्या विधानसभा संघटक लता माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य कमलबाई कल्याणराव गरड, उपतालुकाप्रमुख रोहिणी मुळे, मनीषा गाडगे, शांताबाई करपे, कविता अंगज, विद्या राठोड, संगीता मनाळ, शोभा सरकटे यांचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *