March 23, 2026

वाळूज महानगर,,(ता.18) – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत शेक्षणिक सत्र २०२४-२०२५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध (MTSE) परीक्षेत इयत्ता ८, ९ व १० वी च्या ऑर्किड इंग्लिश स्कूल व ऑर्किड टेक्नो स्कूल मधून ४० विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत इयत्ता ९ वी मधून अमेय वाकडीकर व तन्मय थोरात या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरातून बक्षिसास पात्र ठरले. तर सोहम भगवान थोरात (इ. ८ वी), वेदांत संजय सूर्यवंशी (इ. ९ वी), राज रामू राऊतराय (इ. १० वी) हे विद्यार्थी विशेष बक्षिसास पात्र ठरले. महाराष्ट्र प्रज्ञा शोध (MTSE) परीक्षेचा भविष्यात IIT, IISER, NEET, NDA, MHT-CET प्रेवेश परीक्षेत तसेस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑलिपियाडस, KVPY व इंजीनियरिंग, मेडिकल कॉलेजसाठीच्या इतर प्रवेश परीक्षेच्या पायाभूत तयारीसाठी पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *