March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी 2023 या परीक्षेत बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश संपादन केले.

ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत शैक्षणिक सत्र 2022 -23 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेत इयत्ता 5 वी मधून 62 व इयत्ता 9 वी मधून 49 असे एकूण 111 विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत पात्र ठरले आहे. इयत्ता 8 वी मधून अश्विनी सखाराम केंद्रे हिने राष्ट्रीय ग्रामीण (E-6/10) 6 वा क्रमांक मिळवला, देवाशिष विष्णूदास पाटील याने राष्ट्रीय ग्रामीण (E-9/10) 9 वा क्रमांक मिळवला, तनुश्री कैलास राठोड ग्रामीण सर्वसाधारण (A-3/4) 3 रा क्रमांक मिळवला, सुजल सुग्रीव कदम, सुरज रमेश डोंगरे, दिपाली प्रकाश सावरकर, साई अरुण चौधरी, राज रामेश्वर राउतराई, आदित्य दिपक डुकरे यांनीही यश संपादन करत औरंगाबाद ग्रामीण विभागातून शिष्यवृतीस पात्र ठरले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *