February 21, 2025

वाळूजमहानगर –

 

बजाजगेट ते वाल्मी रोडवरील वळदगाव शिवारात विना परवाना केलेली झाडांची कत्तल.

वाळूज परिसरातील बजाजगेट ते वाल्मी रोडवर वळदगाव शिवारात विना परवाना डेरेदार झाडाची कत्तल करण्यात आली. या संदर्भात वन विभागाकडे तक्रार करुन सुध्दा दुर्लक्ष करत कारवाई करण्यास टाळाटाळ हो असल्याने पर्र्यावरण प्रेमीत नाराजी आहे.
वळदगाव शिवारातील गट नंबर 135 मध्ये एका मोबाईल कंपनीचे टावर आहे. या टावरला गुलमोहर या झाडाच्या फांदा चिकटल्यामुळे शेतमालकाने मजुर आणुन हे झाड कटर मशिनच्या सहाय्याने तोडण्यास सुरवात केली. या डेरेदार झाडासह लगतच असलेल्या व पुर्ण वाढलेले जांभळीचे झाडही मुळासकट कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आले. ही वृक्षतोड सुरु असल्याची माहिती मिळताच वळदगावचे सरपंच अमरसिंग राजपूत यांनी वन विभागाला डेरेदार वृक्षाची कत्तल सुरु असल्याची माहिती दिली. मात्र वन विभागाकडून झाडे तोडणार्याविरुध्द कारवाई करण्यास टाळटाळ केली जात आहे. असा आरोप सरपंच अमरसिंग राजपूत यांनी केला आहे. एक पर्यावरणाचे संतुलनासाठी झाडे लावा-झाडे जगवा ही मोहिम शासनाकडून राबविली जात असून वन विभागाचे अधिकारी या वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

बजाजगेट ते वाल्मी रोडवरील वळदगाव शिवारात विना परवाना केलेली झाडांची कत्तल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *