March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.21)- राहत्या घरी गळफास घेऊन नववीत शिकणाऱ्या एका 16 वर्षे विद्यार्थ्यांने
आत्महत्या केल्याची घटना वाळूजच्या नायगाव बकवालनगर येथे बुधवार (21) रोजी दुपारी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहगड नांद्रा, ता.फुलंब्री येथील योगेश बोडखे व भाग्यश्री बोडके हे पती-पत्नी मुले कुणाल (16 ) व तुषार (8) यांच्यासह वाळुजच्या नायगाव बकवालनगर येथे रवि बकवाल यांच्या रूम मध्ये किरायाने रहातात. कुणाल हा शहरातील रेजिमेंट स्कूलमध्ये नववीत तर तुषार नायगावातील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकतो. बोडखे राहात असलेल्या घरापासून हाकेच्या अंतरावर तुषारच्या आईच्या वडीलांचे किराणा दुकान आहे़. बुधवारी (ता. 21) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे बोडखे पतीपत्नी कामावर ,तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास कुणालचा लहाण भाऊ तुषार हा शाळेतून घरी आला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजविला मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तुषार हा हाकेच्या अंतरावर असलेल्या आजोबाच्या किराणा दुकाना जाऊन दादा दार उघडत नसल्याची माहिती दिली. आजोबा चंद्रकांत आडे तुषारसोबत जात दरवाजा वाजविला मात्र प्रतिसाद मिळला नाही. आजोबा यांना दरवाजाच्या फटीतून आत बघितले असता़ त्यावेळी त्यांना तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. यानंतर युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, योगेश दळवी यांनी ही घटना वाळूज पोलीसांना कळविली असता पोउपनि. सखाराम दिलवाले, पोकॉ. मल्हार गरगडे, पोकॉ.बहुरे आदींनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना कुणाल हा घरातील पंख्याच्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यास बेशुध्द अवस्थेत शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *