February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – अंदाजे 22 ते 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून, दगडावर मृतदेह ठेवून काहीतरी हत्याराने मुंडके धडा वेगळे केले. आणि धड व मुंडके जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका बंद पडलेल्या कंपनीत घडलेली ही ही घटना रविवारी (ता.15) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत पथेजा फोर्जींग ही बंद पडलेली कंपनी आहे. या कंपनीच्या जागेवरील भंगार साहित्य व मुरूम चोरी राजरोसपणे सुरू आहे. या मुरूम चोरीच्या खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अंदाजे वीस ते पंचवीस बाय दीडशे फूट लांबी रुंदीच्या खड्ड्यात अंदाजे 22 ते 25 वर्षीय तरुणणाचा मृतदेह दिसून आला. त्याचे मुंडके शरीरापासून तोडलेले होते. शिवाय अंगात शर्टही नव्हता. विशेष म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येते.

 

कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी या तरुणाचा निर्घृणपणे खून केला असावा. असा पोलिसांचा अंदाज असून मयत तरुणाची ओळख अद्यापही पटलेली नाही. घटनेनंतर फॉरेन्सिक लॅब व स्वानपथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा माग काढण्याचा तसेच मृताची ओळख पटवण्यातचे कार्य सुरू केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *