वाळूजमहानगर, ता.12 (बातमीदार) – बंद असलेल्या एका कंपनीच्या आवारात ठेवलेले विविध प्रकारचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले. वाळूज औद्योगिक वसाहतीत घडलेला हा प्रकार गुरुवारी (ता.11) रोजी दुपारी उघडकीस आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर एल – 18 येथील त्रिदेव ऑटो पार्टस या कंपनीच्या आवारात लोखंड, ॲल्युमिनियम, कॉपर अशा विविध प्रकारचे लोखंडी साहित्य ठेवलेले होते. त्यातील 1 हजार 500 रुपये किंमतीचे साईड पॅनलचे दोन लोखंडी दरवाजे, 4 हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रीकल पेनचे बॉक्स, दोन हजार रुपये किमतीचे एक कॉपरचे केबल. असा एकुण 7 हजार 500 रुपये किमतीचा व वर्णानाचा ऐवज कंपनी बंद असताना आवारातून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता.11) रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्यापुर्वी स्वत:चे फायद्यासाठी व लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने गणेश नानासाहेब शेवाळे वय 35, रा. सिडको वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रामचंद्र बिघोत करीत आहे.

