March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – कंपनीतील तयार झालेले नवीन टायर गोडाऊन मध्ये पोहोच करण्यास सांगितले असता ते परस्पर विकून त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणी तीन आरोपीवर 16 जानेवारी 1997 रोजी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून त्यातील एक आरोपी फरार होता. या घटनेस पंचवीस वर्षे उलटली. त्या फरार असलेल्या आरोपीच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (ता.2) रोजी मुसक्या आवळल्या.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील बी के टी कंपनीचे शाखा व्यवस्थापक राजेश जगनारायण सारडा यांनी 16 जानेवारी 1997 रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्यादी दिली होती की, बिकेटी कंपनीत नोकरीस असताना आरोपी गोडाऊन किपर वसंत आनंदराव मुंदनकर वय 29 वर्षे रा. पुंडलीकनगर, एकनाथ भानुदास लटके वय 30 वर्षे रा. सरस्वती कॉलनी बजाजनगर व यशवंत दिपचंद अहीरे वय 59 वर्षे रा. आबनपुरा तराडी ता. शिरपुर जि. धुळे, यांनी संगणनमताने बिकेटी कंपनीतुन 2 लाख 63 हजार 158 रुपये किमतीचे 193 नवीन टायर पंढरपूर ता. जि. औरंगाबाद येथील गोडाऊन मध्ये नेण्यासाठी मेटॅडोर (एम एच 20 ए- 3809) मध्ये भरुन नेले असता ते टायर गोडाऊन मध्ये न नेता कोठेतरी अज्ञात ठिकाणी नेऊन अपहार करून फसवणुक केली.
या गुन्ह्यातील आरोपी वसंत आनंदराव मुंदनकर, एकनाथ भानुदास लटके यांना 17 जानेवारी 1997 रोजी अटक केली होती.

मात्र तेव्हा पासुन आरोपी यशवंत दिपचंद अहीरे वय 59 वर्षे धंदा मजुरी रा. आबनपुरा तराडी ता. शिरपुर जि. धुळे हा फरार होता. त्या आरोपी विरुद्ध न्यायालयात कलम खटला पाठवला होता. हा आरोपी 25 वर्षापासुन मिळून न आल्यामुळे खटला प्रलंबीत होता. आरोपी यशवंत दिपचंद अहीरे वय 59 वर्षे धंदा मजुरी रा. आबनपुरा तराडी ता. शिरपुर जि. धुळे हा त्याचे आवनपुरा तराडी ता. शिरपुर जि. धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या मुस्क्या आवळल्या. ही कामगिरी डॉ. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपआयुक्त दीपक गिर्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि संदीप शिंदे, पोअं. गणेश सागरे, पोअं. राहुल बंगाळे यांनी आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *