वाळूजमहानगर, (ता.13) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने उद्योगांच्या प्रतिनिधीसाठी” खरेदी आणि व्यवस्थापन साखळी” या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.
पाच सत्रांत ही परिषद होणार आहे. पहिल्या सत्रात बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांचे ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट- पीपल, प्रोसेस अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन होईल. दुसऱ्या सत्रात एसआरजे ग्रुपचे संचालक विनीत पिट्टी हे ‘सिस्टीम्स अँड प्रिन्सिपल टू बूस्ट प्रॉडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी इन सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर तिसऱ्या सत्रात जडे ग्लोबल आयटी सर्विसेसचे उपाध्यक्ष आशुतोष मुत्सद्दी हे ‘एप्लीकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन सप्लाय चेन’ या विषयावर उद्योगाची संवाद साधणार आहेत. चौथ्या सत्रात बॉश इंडियाचे माजी उपमहाव्यवस्थापक मुकुंद कराडखेडकर हे ‘ड्रायव्हिंग इन सस्टेनेबल रेक्रुमेंट अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर शेवटच्या सत्रात इंडुरंस टेक्नॉलॉजीचे कार्यकारी अध्यक्ष संजय संगई हे ‘बिल्डिंग रिलायबिलिटी इन सप्लाय चेन फॉर बिझनेस ग्रोथ अँड प्रमोशन’ या विषयावर उद्योगाशी संवाद साधणार आहेत. या एक दिवसीय परिषदेत विविध उद्योगांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन आयआयएमएम छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष सुशांत पठारे यांनी केले आहे.