February 5, 2026

वाळूज महानगर – कंपनीत काम करीत असताना एका महिलेच्या उजव्या हाताची दोन बोटे प्रेस मध्ये जाऊन ती गंभीर जखमी झाली. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या या अपघाता प्रकरणी शनिवारी 6 डिसेंबर रोजी पुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एक महिला कामगार 20 नोव्हेंबर रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लाट नं. के 68 येथे कामाला गेली होती. कंपनीतील सुपरवायझर आबा गाडेकर याने तीला प्रेस मशीनवर काम करण्याचा अनुभव व कोणताही कोर्स केलेला नसतांना कंपनीतील वायसर बनविण्याची प्रेस मशीनवर जॉब काढण्यासाठी कामाला लावले होते. हे काम करण्यासाठी तीला सुक्षेच्या दुष्टीने हॅन्डग्लोज व इतर कोणातेही साहित्य दिले नाही. ती प्रेस मशीनवर काम करित असतांना सकाळी 7 वाजेच्या सुमारास तिच्या उजवा हाताचे दोन बोटे प्रेस मशीनमध्ये दवल्याने गंभीर मार लागला. तसेच तर्जनीला मुक्का मार लागला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी कंपनीचे मालक अतुल शर्मा, प्रमोद संचेती, तसेच सुपरवायझर आबा गाडेकर व ठेकेदार माणिक झवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *