February 24, 2025


वाळूजमहानगर, (ता.17) – इंस्टाग्रामवर रील बनवणाऱ्या एकोणावीस वर्षीय मुलीला व तिच्या मैत्रिणीला शिर्डीला फिरायला नेले. म्हणून तिचा प्रियकर मित्रासह चौघांनी त्यांची कार अडवून चाकू, कट्यार, दगड व हाताचापटाने तिघांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात कट्यार व चाकुच्या वारामुळे दोन जण गंभीर जखमी झाले. सिनेस्टाईल रित्या ही घटना मंगळवारी (ता.14) रोजी रात्री 8:40 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फोटोग्राफर बद्रीनाथ सखाराम रायकर (वय 28), चेतक रामसिंग उसारे (वय 19) मच्छिंद्र जनार्धन मोगल (वय 32) हे मारोती कार (एम एच 20, जीके -2013) मधून बजाजनगर येथील ओळखीच्या दोन मुली व तिचा भाऊ असे मंगळवारी (ता.14) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिर्डीला गेले होते. तेथून परत आल्यानंतर मुलींना त्यांच्या सोसायटी समोर सोडत असताना रात्री 8.40 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार इसम आले. त्यांनी बद्रीनाथ रायकर याच्या गाडीच्या समोर गाडया आडव्या लावून रस्ता आडवला. व काही एक न विचारता कटर व ब्लेड, दगड, हाताचापटाने मारहान केली. यावेळी दगडाने डोक्यात व कटारीचे पाठीत वार केल्याने रायकर हा गंभीर जखमी झाला. त्यामध्ये 30 ते 35 टाके पडले. तसेच चाकूचे वार केल्याने सोबतचा चेतक रामसिंग उसारे याच्या डाव्या हाताला जखम झाल्याने चार टाके पडले. तसेच मच्छिंद्र जनार्धन मोगल यास हाता चापटाने मारहान केली. परंतू तो घाबरून गाडीतून उडी मारून पळून गेला. त्याचप्रमाणे गाडीच्या काचा दगडाने फोडून नुकसान केले. या प्रकरणी बद्रीनाथ सखाराम रायकर याच्या फिर्यादीवरून आरोपी सुमीत सुभाष रुपेकर, आरफाज शेख व त्याच्या सोबतचे दोन अशा चार जणांनी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 307, 324, 323, 427, 336, 341 भादंवि. सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करत आहेत.

प्रेयसीला फिरायला नेले म्हणून –
फोटोग्राफर रायकर, उसारे व मोगल यांनी दोन मुलींना फिरायला नेले. त्यातील एक रुपेकर याची
प्रेयसी होती. मारहान करत असतांना तु माझी प्रेयसी व तिच्या मैञीणीला गाडीत फिरायला घेवून जातो काय ? असे म्हणत मारहाण करीत होता.
मुलीने ओळखले आरोपी प्रियकराला-
या घटनेनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या दोन मुलींपैकी एका मुलीने सांगीतले की, मारहाण करणाऱ्या मुला मधील सुमीत सुभाष रुपेकर (वय 19) व आरफाज शेख (वय 19) दोन्ही रा.साजापूर हे माझे मित्र असून सुमीत रुपेकर याच्या सोबत माझे प्रेम संबंध होते. आता आमच्यात पटत नाही. त्यामुळे मी त्याला बोलत नाही. त्याच्या सोबतचे इतर मुले माझ्या ओळखीचे नाहीत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *