वाळूजमहानगर, (ता.30) – वाळूज परिसरातील तिसगाव येथे सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रांजणगाव (पोळ) विद्यालयाची विद्यार्थिनी प्रिती रामेश्वर कापसे ने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत वयोगट -17 व वजनगट -43 मध्ये जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे प्रीती कापसेची विभागीय पातळीवर होणाऱ्या कुस्ती क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती गुरु व वडील पैलवान रामेश्वर कापसे यांच्या तालमीत तयार होत असून, शाळेत क्रीडा शिक्षक शिवाजी महाजन यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या निवडीमुळे संस्थेचे अध्यक्ष इंदुमती डोणगावकर, सचिव देवयानी डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे, मुख्याध्यापक सुधाकर थोरात, क्रिडाशिक्षक शिवाजी महाजन, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, विलास जाधव, अनिल कुमावत, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, सी.एच. गायकवाड, ए.एन. शेख, आर. एच. शिरसाट, के.बी.मोरे, तुकाराम शेलार, प्रतिभा नितनवरे, आनंद बोडखे, करवारे मामा, ए. एस.बीरोटे, बि.जे.पांडव आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रीतीचे स्वागत केले.