February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.28 – गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघासाठी गरुड झेप अकॅडमीचे प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज रविवारी (ता.28) रोजी दाखल केला. यावेळी सोनवणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सलग पंधरा वर्ष आमदार म्हणून जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी जनतेचा विश्वासघात केलाच, परंतु सामान्य जनतेच्या, तालुक्याच्या विकासाऐवजी मिरचीचा भुकटा फेकुन जनतेच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे काम केले. अशा राजकारण्यांना यावेळी सुज्ञ जनता घरी बसवेल याची मला खात्री आहे. आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी तालुक्यात ठराविक भागात व ठराविक प्रश्नांवरच काम करण्यात आले. एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती करणे, कंपनी कारखानदार, उद्योजक यांना संरक्षण मिळवून देणे, एमआयडीसीतील मूलभूत प्रश्न यासह ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देणे, सरकारी नोकरदार, शिक्षक यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह पाणी, आरोग्य, रस्ते या मूलभूत प्रश्नांना नजरेसमोर ठेवून पुढील पाच वर्षांमध्ये मार्गी लावण्यासाठी मायबाप जनतेने आशीर्वाद रुपी माझ्यावर विश्वास ठेवावा. धनाढ्य व भ्रष्टाचारी राजकारण्यांना आपली पोळी भाजण्याची व जनतेचा विश्वासघात करण्याची सवय झाली आहे. जनतेच्या मनातील विकास व्हावा तसेच मी या धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा नारा देत आहे. मतदार राजाने भूमिपुत्रावर विश्वास दाखवा व मला ही संधी द्यावी. या दृष्टिकोनातून मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून पुढील काळामध्ये प्रचार दरम्यान मुख्य अजेंडा हाती घेऊन त्यावर काम केले जाईल. तसेच निवडणुका या पैशाच्या बळावर किंवा जातीपातीचे राजकारण न करता ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, उद्योजक वर्गांना केंद्रस्थानी ठेवून पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे देखील यावेळी अपक्ष उमेदवार प्रा.डॉ. सोनवणे यांनी सांगितले. यावेळी सोनवणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *