
वाळूज महानगर, (ता.4) – लायन्स क्लब औरंगाबादच्या वतीने दिला जाणारा 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज येथील उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय सांभाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सामाजिक न्यायभवन सभागृह, खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
डॉ. प्रा. संजय सांभाळकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. नुकताच डॉ सांभाळकर यांना नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. मीमांसा फाऊंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रियेटीव्ह, ह्युमन राईट्स फाऊंडेशन, मीडिया पोलीस सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. तसेच रिअल इंडो ग्लोबल व्हिजन गुरुकुल फाऊंडेशन धुळे यांच्या मार्फत दिला जाणारा जून 2023 चा राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार सुद्धा डॉ सांभाळकर यांना देण्यात आला. या वर्षातील डॉ सांभाळकर यांना दिल्या जाणारा हा तिसरा पुरस्कार आहे. त्यांचे या निमित्त सर्व क्षेत्रातून अभिनंदन केल्या जात आहे. त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
