February 5, 2026

वाळूजमहानगरमाझ्या शॉप समोर येऊन धिंगाणा घालू नको, असे समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पान टपरी चालकाला समोरच्या चहाची टपरी चालवणाऱ्याने चाकूने सपासवार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपी पोलीस ठाण्यात तर जखमी दवाखान्यात उपचार घेत आहे. ही सणसणाटी घटना वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शुक्रवारी (ता.16) सप्टेंबर रोजी रात्री वाजेच्या सुमारास घडली.

आरोपी – संदीप उर्फ बिच्छू थिकणे

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील विशाल सुनील काळे (वय 33) याचे लक्ष्मी माता मंदिराजवळ बालाजी पान शॉपचे दुकान आहे. याच दुकानासमोर आरोपी संदीप उर्फ बिच्छू थिकने याचे चहाचे दुकान आहे. संदीप थिकने हा गेल्या काही दिवसापासून विशाल काळे याच्या पान शॉप समोर येऊन आरडाओरडा करत होता. त्यामुळे गिऱ्हाईकावर परिणाम होतो, म्हणून काळेने त्यास दोन-तीन वेळा समजावून सांगितले. त्याचा राग मनात धरून तो काळेला शिवीगाळ व धमकी देत होता. शुक्रवारी (ता.16) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संदीप थिकने हा विशाल काळेच्या पान शॉप समोर आला व वाद केला. त्याला समजावत असताना तो म्हणाला की, तुला जास्त माज आला आहे. तुझा माज मी जिरवतो. असे म्हणून शिवीगाळ करत धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर काळेने शॉप बंद करून साडेदहा वाजेच्या सुमारास संदीप जाधव याच्या जगदंबा हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काळे हा जेवण करून घरी निघाला असता त्याला संदीपचा फोन आला. तो म्हणाला की, मी तुझ्या घराजवळ आलो असून मला तुला बोलायचे आहे. तु ये. असे म्हणाला. त्यामुळे काळे हा घराजवळ गेला असता तेथे थिकने हा उभा होता. यावेळी काय बोलायचे ते सांग. असे विशाल काळे म्हणला असता थिकणे याने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व चाकूने पाठीवर डाव्या दंडावर व डाव्या मांडीवर वार केले. त्यामुळे विशाल काळे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. तो त्याच्या तावडीतून कसाबसा सुटून घरी गेला आणि बेशुद्ध पडला. त्याला उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात असून आले असून तो मृत्यूची झुंज देत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी संदीप उर्फ बिच्छू थिकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *