March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.10) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून 49 कोटी अकाउंट झिरो मध्ये उघडले, किसान सन्मान योजना, मजूर कामगार स्वनिधी योजना, मुद्रा लोन, बचत गट कर्ज तसेच वेगवेगळ्या राज्यातील रस्ते. यामुळे भारताची प्रगती झाली. मान, शान वाढली, आर्थिक परिस्थिती सुधारली. 9 वर्षात झालेली ही कामे जनतेपर्यंत पोहोचवून नरेंद्र मोदी यांच्यासाठी समर्थन मागणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी बजाजनगर येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पार्टी संभाजीनगर पश्चिमच्या वतीने मोदी@9 जनसंपर्क अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. भागवत कराड यांनी भाजपने केलेल्या नववर्षाच्या कार्यकाळातील विकास, विविध योजना याची माहिती देत 2024 साठी जनतेचे समर्थन मोदीसाठी मागणार असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, 29 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहे. प्रत्येक राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक कामे झाली. 30 मे ते 30 जून हा एक महिना सेवा, सुशासन व गरीब कल्याण ही त्रिसूत्री घराघरात पोहोचावी. यासाठी भाजपच्या वतीने सर्व स्तरातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनसभा, लाभार्थी संमेलन, हितगुज, व्यापारी संमेलन, बुद्धिवंत मेळावा, योगदिन, मन की बातचा समावेश आहे. या शिवाय प्रत्येक बुथवर जाऊन व्हेरिफिकेशन करणार, प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार तसेच वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार. 

 

याशिवाय 25 जून रोजी काळा दिवस पाळणार, 25 जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लावली होती. असेही डॉक्टर कराड म्हणाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा प्रभारी राजू शिंदे, जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया, छत्रपती संभाजीनगर पश्चिम तालुका अध्यक्ष वसंत प्रधान, रांजणगाव (शेणपुंजी) येथील पंचायत समिती सदस्य दीपक बडे, बजाजनगर येथील पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, संभाजी चौधरी प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *