वाळूजमहानगर, ता.21 (बातमीदार) – ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त वाळुज येथील शिवाजीनगर भागात असलेल्या कलानगरातील श्री गजानन महाराज व प्रभू श्रीराममंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वेदिका राठोड या मुलीच्या हस्ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नारळाचे पवित्र झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास श्री गजानन महाराज यांचे भक्त कविराज राठोड, श्री गजानन महाराज मंदिर समितीचे आर के भराड, योगेश चिमखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या झाडाचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी श्री गजानन महाराज मंदिर व प्रभू श्रीराम मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.