
वाळुज महानगर – गावाची खबर बात पोलिसांना कळविण्याची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटलाच्याच बांधकामावरील 2 लाख रुपये किमतीचे 4 टन लोखंडी स्टील अज्ञात चोरट्यांनी एका पांढरट रंगाच्या पीकअप मधून लंपास केले. ही चोरीची घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी खोजेवाडी येथे उघडकीस आली. खुद्द पोलीस पाटलाच्या घरी चोरी झाल्याने पोलीस पाटलांसह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण फकिरराव पराड (56 वर्ष) हे खोजेवाडी येथील पोलीस पाटील आहे. त्यांचे खोजेवाडी या ठिकाणी आदित्य लॉन्स नावाचे मंगल कार्यालय आहे. त्याचे बांधकाम 5 ऑक्टोंबर पासुन सुरु असुन दुसऱ्या मजल्याचे बंधकाम करण्यासाठी लागणारे 8 एमएम चे 5 टन लोखंडी स्टील 20 ऑक्टोबर रोजी बांधकामावर आणुन ठेवले. त्यापैकी 1 टन लोखंडी स्टील 26 सप्टेंबर रोजी
बांधकामासाठी वापरले. उर्वरीत 4 टन लोखंडी स्टील बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेले असताना अज्ञात आरोपींनी 2 लाख रुपये किमतीचे 4 टन लोखंडी स्टील चोरून घेऊन गेले. ही चोरीची घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आतण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही चोरट्याचे फुटेज –
पोलीस पाटील लक्ष्मण पराड यांच्या बांधकामावर चोरी झाल्याचे लक्षात येतात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपी एका पांढरट रंगाच्या चारचाकी पिकअप मधून बांधकामाच्या ठिकाणी आले. व काही वेळ ऊभे राहीले व तेथुन निघुन जात असतांना लोखंडी स्टील त्या पिकअप मध्ये भरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डींग मध्ये दिसले.
पोलीस पाटील सुद्धा असुरक्षित –
गावात वाद विवाद असो किंवा कोणतीही अनुचित घटना. त्याची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला कळवणे हे पोलीस पाटलाचे काम. पोलीस पाटील म्हटले की, गावातील सर्वात सुरक्षित व्यक्ती समजल्या जात असे. मात्र अज्ञात आरोपींनी खुद्द पोलिस पाटलाच्या घरी चोरी करून 2 लाखाचा चुना लावला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
