March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – वाळुज एम आय डी सी पोलीस ठाण्याची नव्याने धुरा सांभाळणारे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोलीस ठाण्याचा चार्ज स्वीकारताच त्यांच्यावर वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी स्वागताचा वर्षाव केला.


पोलीस आयुक्त हद्दीतील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हे अत्यंत संवेदनशील पोलीस ठाणे आहेत. भारतातील प्रत्येक राज्यातील नागरिक येथे स्थायिक झाल्याने या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राला मिनी भारत संबोधल्या जाते. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी पोलीस आयुक्त मनोज लोहीया यांनी गुन्हे शाखेचे अनुभवी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यावर सोपवली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, विटावा, घाणेगाव, वडगाव (को.), कमळापूर आदी गावातील उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी स्वागताचा वर्षाव केला.
यावेळी प्रामुख्याने उद्योजक संपत भांगे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक रमाकांत भांगे प्रगती महिला मंडळाच्या नूतन आडसरे, कैलास बोरुडे, नारायण माकोडे, अखिल भारतीय छावा संघटनेचे अमोल काळे, मनोहर समीर आदींचा समावेश होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *